अर्जुन तर संन्यासि
होउनी रैवतकीं
बसला ।
झालि सुभद्रा
नष्ट असा ग्रह
त्याच्या मनिं
ठसला ।
वैराग्याचा
पुतळा केवळ
सांप्रत तो
बनला ।
तत्वनिष्ठ वेदान्ती
होउनि तुच्छ
मानितो विषयाला
।
प्राणायामें
कुभंक करुनी
साधित योगाला
।
सुभद्रेची मूर्ती
हृदयीं धरुनि
करितसे ध्यानाला
।
ही एक गोष्ट
मज अनुकूलचि
जाहली ।
कीं ढोंग नसुनि
खरि वृत्ति
यतिस साधली
।
नासिकाग्र दृष्टी
सर्वकाल लागली
।
भोळे अमुचे
दादा तेथें
जाति दर्शनाला
।
तरी खचित सांगतो
तयाच्या लागति
नादाला ।
|