दिसलि पुनरपी
गुप्त जाहली
प्रिया सुभद्रा
घोर वनीं ।
येथें सुंदरि
कैशी आली हेंचि
कळेना मज अजुनी
॥
माझ्या वेषा
खरें मानुनी
हलधरही लागत
भजनीं ।
त्रिकालज्ञ
परि मोह पावले
कैसे न कळे
गर्गमुनी ।
कपटी कृष्णाचीही
बुद्धी गेली
कैशी ती भुलुनी
।
या सर्वांचा
विचार करितां
जातों मूढचि
होवोनी ॥
|