जीवन सुखदु:खाची
जाळी, त्यात
लटकले मानव
कोळी
एकाने दुसऱ्यास
गिळावे, हाच
जगाचा न्याय
खरा,
हीच जगाची परंपरा
!
तू जपून टाक
पाऊल जरा, जीवनातल्या
मुशाफिरा ॥
पापपुण्य जें
करशिल जगतीं,
चित्रगुप्त
मागेल पावतीं
पापाइतुकें
माप ओतुनी,
जे केले ते
तसें भरा ॥
निरोप जेव्हा
येईल वरचा,
तेव्हा होशिल
सर्वांघरचा
तोंवर तूं या
रिपु जगाचा,
चुकवुनि मुख
दे तोंड जरा
॥
दानव जगति मानव
झाला, देवाचाही
दगड बनविला
कोण कोठला तूं
तर पामर, चुकून
तुझा करतील
चुरा ॥
|