जय कृष्णातटवासा ।
निजजनभयविध्वंसा ।
करितें मी नवस असा ॥
भुलुनि मनीं द्रव्याला ।
मज द्यावें जरठाला ।
कुमति अशी जनक आला ।
नाच झाली तरि तुजला ।
लक्ष वाती वरसाला ।
लाविन रे गिरिजेशा ॥
गीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर
-
???
नाटक
-
संगीत शारदा (१८९९)
राग
-
सारंग
(मूळ संहिता)
ताल
-
दादरा