शंभो शिवहर, करुणाकर
हे विश्वेशा, गौरीप्रियकरा ॥
अज्ञानी बलहीन आम्ही
शरणागत तव चरणां
धरि शिरिं करुणयुत कर ॥
मार्गा आम्हां सर्वपरी ।
हे शशिमौली, तू सांभाळी,
जय काळीश्वर ॥
गीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर
-
???
नाटक
-
संगीत शारदा (१८९९)
चाल
-
’वंदनै सुरवृंदाचित्तपद’