बाळपणींचा काळ सुखाचा, आठवतो घडिघडी ।
तशि नये फिरुन कधिं घडी ॥

किति हौसेनें टाकिलि असती त्यांत मागुती उडी ।
परि दुबळी मानवकुडी । (चाल)
मनिं नव्हति कशाची चिंता ।
आनंद अखंडित होता ।
आक्रोश कारणापुरता ।
जें ब्रम्ह काय तें मायबाप ही जोडी ।
खेळांत काय ती गोडी ॥
 
 
गीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर - ???
नाटक - संगीत शारदा (१८९९)
ताल - धुमाळी
चाल - ’हिंगण दिपाची पद्‌मिण हिंडती’
For the printable version of this song, click here.