जरी कुणा श्रीमंताची सून होय शारदा ।
तरी त्यास साजे ऐशी तिची रूपसंपदा ॥
बघुनि तीस आकाशींची चांदणी दिपावी ।
नाहिं रूपवंती दुसरी ह्जारांत ठावी ।
हंसत थोर सरदारांनी मागणी करावी ।
परि मला मनचे मांडे चुरुनि काय फयदा ॥
गीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर
-
???
नाटक
-
संगीत शारदा (१८९९)
चाल
-
’राहेना गोविंद राधे’