तरुण कुलिन गोरा, हंसतमुख, तरुण कुलिन गोरा ।
पाहिजे मुलीला चतुर सद्गुणी सुंदरसा नवरा ॥

(चाल) पुरवील तिची जो हौस सदा बहुपरी ।
घालील शाल जो मायेची तिजवरी ।
तिळमात्र तिला जो दु:ख न देइल घरीं ।
विद्वानांत हिरा, चकाकत, विद्वानांत हिरा ॥
 
 
गीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर - ???
नाटक - संगीत शारदा (१८९९)
चाल - ’माळिण नवतरणी’
For the printable version of this song, click here.