बळ ज्याचें त्यास तें ।
मंथनविष जग जाळित सुटलें, विष्णु न घे ।
विधि तोहि न घे, शिव सहजीं पचवि तें ॥

वयोवृद्ध परि त्या शंभूनें । उगाचि कां, जी कुमारिका,
वरिलें त्या गौरिते ॥

शक्ति तशी माझ्याही अंगीं । म्हणुनि हवी स्त्री तरुण नवी ।
यात चुके कोणतें ॥
 
 
गीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर - ???
नाटक - संगीत शारदा (१८९९)
चाल - ’विधितनये पाव गे’
For the printable version of this song, click here.