श्वानाहुनि
अति नीच तुम्ही
रे, स्वार्था
मांजरसे टपतां
।
जंबुकगुरु जनवंचनकामीं
। साधुबकापरि
वरि दिसतां
॥
वेदशास्त्रसंपन्न
म्हणवितां
। केलि मुखोद्गत
ती गीता ।
तत्व तयांतिल
कळे हेंच का
। सत्यपराङमुख
कां होतां
॥
श्वान नाचतें
पुच्छ घोळितें,
चाटि अंग तुकड्याकरितां
।
तसें नाचतां
आर्जव करितां,
रुचे समर्था
तें वदतां
॥
तो म्हणे अश्व
वृषभाला ।
तुम्ही मान
तुकवितां त्याला
।
तो म्हणे अहो
रवि मेला ।
लावितां
पदर डोळ्यांला
।
मी कसा तरुण
रंगेला ।
म्हणतांच
मदन अवतरला
।
नरनंदी हे लक्ष्मीनंदन
। त्यांत
भोंवतीं तुम्हि
जमतां ।
श्वान काक बक
ढोंगी सोंगी
। दिवटी त्याच्या
करि देतां
॥
|