श्रीमंत पतीची
राणी, मग थाट
काय तो पुसतां
।
बंगला नवा नवकोनी,
फुलबाग बगीचा
भवता ।
किती दासी जोडुनि
पाणी,
"जी" म्हणतील
कामाकरितां
।
ही जात्या चतुर
शहाणी,
पति मुठींत
ठेविल पुरता
।
सुग्रास बसुनि
खायाला ।
मउ शय्या लोळायाला
।
गुजगोष्टि काळ
जायाला ।
ना काम, धाम,
ना चिंता ।
ही फुगेल बघतां
बघतां ॥
|