हा महाल कसला रानझाडि ही दाट
अंधार रातिचा, कुठं दिसंना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव
केलि कशी करणी ?
सख्या रे, घायाळ मी हरिणी

काजळकाळी गर्द रात अन्‌ कंप कंप अंगात
सळसळणा-या पानांनाही रातकिड्यांची साथ
कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावुनी

गुपित उमटले चेह-यावरती, भाव आगळे डोळ्यात
पाश गुंतले नियतीचे रे, तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवुनी
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - सामना (१९७५)
राग - सोहनी (नादवेध)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.