रतिहुन सुंदर मदन-मंजिरी !
मदनाचे वरदान तुला ॥
ललित कोमल तव सुंदरता लाजविते मंदार-फुला
बघुनि तुला गगनात खंगते कलेकलेने चंद्रकला
कळे न मजला, वृथा फुलांचा, नाद कशाला हवा तुला ?
गीत
-
विद्याधर गोखले
संगीत
-
छोटा गंधर्व
स्वर
-
प्रसाद सावकार
नाटक
-
सुवर्णतुला (१९६०)