कशि केलीस माझी दैना
मला तुझ्या बिगर करमेना !
घडिभरी माझिया मना, चैन पडेना, झोप येईना,
मला तुझ्या बिगर करमेना !

तू राघु तुझी मी मैना
माझं रूप बिलोरी ऐना
अंगी इष्काचा आजार, करी बेजार, कमति होई ना,
मला तुझ्या बिगर करमेना !

तू हकीम हो‍उनि यावे
एकांती औषध द्यावे
दे चुंबन साखरपाक , मिठीचा लेप, मजसि सजणा,
असे मनमोहना,
मला तुझ्या बिगर करमेना !
 
 
गीत - विद्याधर गोखले
संगीत - नीळकंठ अभ्यंकर
स्वर - कीर्ती शिलेदार
नाटक - संगीत स्वरसम्राज्ञी (१९७२)
राग - यमन (नादवेध)
For the printable version of this song, click here.