आई उदे ग अंबे
उदे, उदे
आई उदे ग अंबाबाई
!
उदे उदे ग अंबाबाई
गुणगान लेकरू
गाई
आई उदे ग अंबाबाई
तुळजापूरची
तुकाई आई .....
गोंधळा ये
कोल्हापूरची
लक्षुमी आई
..... गोंधळा
ये
मातापूरची रेणुका
आई ..... गोंधळा
ये
आंबेजोगाई जोगेश्वरी
..... गोंधळा
ये
गुणगान लेकरू
गाई
आई उदे ग अंबाबाई
आईची मूर्ति
स्वयंभुवरि
शोभली, सिंव्हावरी
साजरी
सिंव्हावरी
साजरी, हि-यांचा
किरिट घातला
शिरी
चंडमुंड महिशासूर
आईनं धरून रगडला
पायी
आई उदे ग अंबे
उदे, उदे
गुणगान लेकरू
गाई
आई उदे ग अंबाबाई
आला नवरात्राचा
महिना, आळवावा
आईचा महिमा
आळवावा आईचा
महिमा, त्याला
काय सांगावी
उपमा ?
अहो येळ साधुनी
खेळ मांडिला
आशिर्वाद दे
आई
आई उदे ग अंबाबाई
गुणगान लेकरू
गाई
आई उदे ग अंबाबाई
शिवछत्रपतींची
शिवाई.....
गोंधळा ये
शाहुराजश्रींची
अंबाई.....
गोंधळा ये
विदर्भनिवासिनी
चंडी आई.....
गोंधळा ये
महाराष्ट्र
कुलस्वामिनी
आई..... गोंधळा
ये
गुणगान लेकरू
गाई
आई उदे ग अंबाबाई
|