| सावळ्या: |
खबरदार जर टाच
मारुनी जाल
पुढे चिंधड्या
उडवीन राई राई
एवढ्या !
कुण्या गावचे
पाटील आपण कुठे
चालला असे
शीव ही ओलांडून
तीरसे ?
लगाम खेचा हा
घोडीचा राव
टांग टाकुनी
असे या तुम्ही
खड्या अंगणी
!
पोर म्हणूनी
हसण्यावारी
वेळ नका नेऊ
ही
मला का ओळखले
तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा
मी बच्चा असे
हे हाड ही माझे
लेचेपेचे नसे
या नसानसातून
हिंमत बाजी
वसे
खबरदार जर टाच
मारुनी जाल
पुढे चिंधड्या
उडवीन राई राई
एवढ्या !
|
| स्वार: |
मळ्यात जाऊन
मोटेचे ते पाणी
भरावे तुवा
कशाला ताठा
तुज हा हवा
?
मुठीत ज्याच्या
मूठ असे ही
खड्गाची तो
बरे
वीर तू समजलास
काय रे ?
थोर मारिसी
अशा बढाया पराक्रमाच्या
जरी
कुठे तव भाला
बरची तरी ?
हे खड्गाचे
बघ पाते किती
चमकते
अणकुचीदार अति
भाल्याचे टोक
ते
या पुढे तुझी
वद हिंमत का
राहते ?
खबरदार जर टाच
मारुनी जाल
पुढे चिंध्ड्या
उडवीन राई राई
एवढ्या !
|
| सावळ्या: |
आपण मोठे दाढीवाले
अहा शूर वीर
की -
किती ते आम्हाला
ठाउकी !
तडफ आमुच्या
शिवबाची तुम्हा
माहिती न का
?
दाविती फुशारकी
का फुका ?
तुम्हा सारखे
असतील किती
लोळविले नरमणी
-
आमुच्या शिवबाने
भर रणी
मी असे इमानी
चेला त्यांचे
कडे
हुकुमाविण त्यांच्या
समजा याचे पुढे
देई न जाऊ मी
शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो,
खबरदार जर टाच
मारुनी जाल
पुढे चिंधड्या
उडवीन राई राई
एवढ्या !
|
|
|
| |
लाल भडक ते
वदन जाहले बाळाचे
मग कसे
स्वार परि मनि
हळू का हसे
?
त्या बाळाच्या
नयनी चमके पाणी
त्वेषामुळे
स्वार परि सौम्य
दृष्टीने खुले
चंद्र दिसे
जणू एक, दुसरा
तपतो रवि का
तर
ऐका शिवबाचे
हे स्वर -
आहेस इमानी
माझा चेला खरा
चल इनाम घे
हा माझा शेला
तुला
पण बोल सावळ्या
बोल पुन्हा
एकदा
"खबरदार जर
टाच मारुनी
जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई
एवढ्या !"
|