काय बाई सांगू
? कसं गं सांगू
?
मलाच माझी वाटे
लाज
काही तरी होऊन
गेलंय आज !
उगीच फुलुनी
आलं फूल
उगिच जीवाला
पडली भूल
त्या रंगाचा,
त्या गंधाचा
अंगावर मी ल्याले
साज
काही तरी होऊन
गेलंय आज !
जरी लाजरी,
झाले धीट
बघत रहिले त्याला
नीट
कुळवंताची पोर
कशी मी
विसरुन गेले
रीतरिवाज ?
काही तरी होऊन
गेलंय आज !
सहज बोलले हसले
मी
मलाच हरवुन
बसले मी
एक अनावर जडली
बाधा
नाहि चालला
काही इलाज
काही तरी होऊन
गेलंय आज !
|