घाल घाल पिंगा
वाऱ्या, माझ्या
परसात
माहेरी जा,
सुवासाची कर
बरसात !
"सुखी आहे पोर"-
सांग आईच्या
कानात
"आई, भाऊसाठी
परी मन खंतावतं
!
विसरली का ग,
भादव्यात वर्स
झालं,
माहेरीच्या
सुखाला ग, मन
आचवलं.
फिरुन-फिरुन
सय येई, जीव
वेडावतो
चंद्रकळेचा
ग, शेव, ओलाचिंब
होतो.
काळ्या कपिलेची
नंदा खोडकर
फार,
हुंगहुंगुनिया
करी कशी ग,
बेजार !
परसात पारिजातकाचा
सडा पडे,
कधी फुलं वेचायला
नेशील तू गडे
?
कपिलेच्या दुधावर
मऊ दाट साय
माया माझ्यावर
दाट जशी तुझी,
माय ... !"
आले भरून डोळे
पुन्हा गळा
नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी
जीव व्याकूळला
!
|