केतकीच्या बनी
तिथे, नाचला
ग मोर
गहिवरला मेघ
नभी, सोडला
ग धीर
पापणीत साचले,
अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया,
मनामनात धुंदले
ओठावरी भिजला
ग, आसावला सूर
भावफूल रात्रिच्या
अंतरंगि डोलले
धुक्यातुनी
कुणी आज, भावगीत
बोलले
डोळियात पाहिले,
कौमुदीत नाहले
स्वप्नरंग स्वप्नीच्या,
सुरासुरात थांबले
झाडावरी दिसला
ग, भारावला
चकोर
|