जन विजन झालें आम्हा ।
विठ्ठला नामा प्रमाणे ॥१॥

पाहें तिकडे मायबाप ।
विठ्ठल आहे रखुमाई ॥२॥

वन पट्‍टण एकभाव ।
अवघा ठाव सरता झाला ॥३॥

आठव नाहीं सुखदु:खा ।
नाचे तुका कौतुकें ॥४॥
 
 
रचना - संत तुकाराम
संगीत - यशवंत देव
स्वर - रामदास कामत
राग - चंद्रकंस (नादवेध)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.