कुणि काहि म्हणा, कुणि काहि म्हणा
अनुसरले मी अपुल्याच मना

रीत म्हणा, विपरीत म्हणा
दिले झुगारुनि आवरणा

रीति-कुरीति, नीति अनीति
आता उरली चाड कुणा ?
लोक लाज भय धरु कशाला
मागायाचे काय जना ?

जळल्या सा-या आशा मनिच्या
पुसल्या उरल्या त्याहि खुणा
जीव भरेना हौस पुरेना
वाढतोच घरि काम दुणा
यास्तव हा परपुरुष परिणिला
मन मिनले गोविंद गुणा
 
 
गीत - ज. के . उपाध्ये
संगीत - यशवंत देव
स्वर - कृष्णा कल्ले
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.