खिन्न या वाटा दूर पळणा-या
या स्मृती सा-या जीव छळणा-या

लाडक्या शपथा लाजरी वचने
पाकळ्या त्यांच्या आज गळणा-या

रात वैरीण ही सात जन्मांची
आणि या उल्का तोल ढळणा-या

चांदण्याकाठी धुंद त्या भेटी
या व्यथा उरल्या आज जळणा-या
 
 
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - उषा मंगेशकर
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.