चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी; काही केल्या फुलेना
गेले ’आंब्याच्या’ वनी
म्हंटली मैनेसवे गाणी
आम्ही गळ्यांत गळे मिळवुन रे
गेले केतकीच्या बनी
गंध दरवळला वनी
नागासवे गळाले देहभान रे
चल ये रे ये रे गड्या
नाचु, उडू घालु फुगड्या
खेळु झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम्
हे विश्वाचे अंगण
आम्हा दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे
जन विषयाचे किडे
यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान रे
चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी-चाफा ? कोठे दोघे जण रे ?
गीत
-
बी (नारायण मुरलिधर गुप्ते)
संगीत
-
वसंत प्रभू
स्वर
-
लता मंगेशकर
राग
-
यमन
(संगीत-सरिता)
Lata Mangeshkar,
Asha Bhosale