घन बरसत बरसत आले

वनि मोराचा षड्ज लागला
झाडांतुन मल्हार जागला
मन चकित, सुगंधित झाले

शिवधनुष्य कडकडले वरती
सुखावली आशेने धरती
खग तोरण धरित उडाले

सजल धुंद आनंद चहुकडे
नभ रत्‍नांचे तृणांत उघडे
वन निथळत अमृत न्हाले
 
 
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - वीणा सहस्त्रबुद्धे
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.