चल नाच नाच रे नंदकिशोरा
सूर मुरलिचा घुमव जरा

रुमझुम रुमझुम पैंजण वाजति
तालावरती गोपी नाचति
सुर स्वर्गातुनी कौतुक पाहति
आनंदाचा दिवस खरा

जललहरींचा नाच थांबला
अवखळ वायू मध्ये थबकला
कोकीळ गाई न गायनाला
काय जादु ही मुरलीधरा
 
 
गीत - जी. के. दातार
संगीत - नागेश मसुतो
स्वर - लता मंगेशकर
For the printable version of this song, click here.