अहो अहो कारभारी
हो कारभारी
मध्यान् रात्री
कुठं चालला
गुमान या तुम्ही
माघारी
अग ल ... ल
... लंका, नको
श ... शं ...
शंका
अडवू नको मला
तू युक्तीनं
हातात टाळ,
ग ... ग ...
गळ्यात माळ
भ ... भ ...
भजनाला जातोय
भक्तीनं
इठोबा रखुमाई
भजन करता, तहाभूक
हरतीया भा ...
भा ... भादरणी
नका काढू शक्कल,
हाये मला अक्कल,
तमाशाला चललाय्
कुठं ?
घरची भाकरी
सोडून भायेर
उकिरडा फुकताय
तिथं
तमाशाला न्हाई
.....
मग संगती येते,
खरंखोटं पहाते,
बसून तुमच्या
शेजारी
आता कुठं जातो,
कॅ ... कॅ ...
कॅन्सल करतो
कुठल्या कुठं
मी झ ... झ
... झक मारली
अहो खुशाल जावा,
जीव तुमी लावा,
म्हायेरची मी
वाट धरली
पाया पडतो,
हात जो ...
जो ... जोडतो
करू नको उलटी
अं ... अं ...
अंबारी
अगं अगं कारभारणी
ग कारभारणी |