सोनफूल तू,
रानवेल मी
सोड हा अविचार
तू
आधार तू, जीवनी
आधार तू !
कोठली मी? तू
कुणाचा? योग
आला दो जीवांचा
शून्य माझ्या
अंतरीचा उजळला
अंधार तू !
चांदण्याचा
हा फुलोरा,
रोमरोमी ये
शहारा
दिवसरात्री
उधळला रे आगळा
शृंगार तू
तू विसावा प्राणनाथा,
प्रीतिचा सौभाग्यदाता
सोनियाच्या
पाउलांनी दिपविला
संसार तू |