उई साजण आला
असा दूर का जवळ ये जरा
भरे धुंद प्याला - उई साजण आला

उभी रूपराणी गुलाबी गुलाबी
नजर लाडकी ही शराबी शराबी
बेभान मी बेभान तू
अशी रात ही अशी साथ ही
असा कैफ आला - उई साजण आला

गालात लाली डोळे नशीले
ओठात माझ्या गाणे रसीले
मस्तभरी जादूभरी
अशी रात ही अशी साथ ही
असा कैफ आला - उई साजण आला

साधून घे ही संधी सुखाची
पर्वा कशाला वेड्या जगाची
अरे बुलबुला प्रीतिफुला
अशी रात ही अशी साथ ही
असा कैफ आला - उई साजण आला
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - धाकटी बहीण (१९७०)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.