बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
शिंपण घातले चाफ्याचे शिंपण घातले

ऊन्हाचे पाटव नेसले टकले
वा-याचे पैंजण घातले फेकले
डोळ्यात काजळ, केवडा, अत्तर
लावले, पुसले

हर्षाचे हिंदोळे सोडले बांधले
मयूर मनाचे रुसले हासले
हिंदोळे हर्षाचे मयूर मनाचे
हासले, नाचले

दिसला लपला चकोर मनाचा
फुलला ढळला बहर चंद्राचा
लामण सरूयाचा श्रावण नेत्राचा
विझले, तेवले
 
 
गीत - इंदिरा संत
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - सर्वसाक्षी (१९७८)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.