मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते
उमलण्याआअधीच कैसे, फूल पायी तुडविते !

खेळ नियती खेळते की, पाप येते हे फळा
वाहणाऱ्या या जळाला कोण मार्गी अडविते ?

ईश्वरेच्छा हीच किंवा, संचिताचा शाप हा
चंद्ररेखा प्रतिपदेची कोण तिमिरी बुडविते ?
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - आनंदघन
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - तांबडी माती (१९६९)
For the printable version of this song, click here.