त्याची माझी
प्रीत अलौकीक
दिशा जाणती
चारी ग
आता कसली चोरी
ग
तो नगरीचा झाला
राजा
मी म्हणते पण
केवळ माझा
त्याच्या भवती
धरिती फेर स्वप्ने
माझी सारी ग
आता कसली चोरी
ग
फुलात दिसती
त्याचे डोळे
सुगंधात सहवास
दरवळे
स्मरणे त्याच्या
घेई लालिमा
कांती माझी
गोरी ग
आता कसली चोरी
ग
वावरता मी त्याच्या
मागे
पदापदावर सुदैव
जागे
सप्तपदीला विलंब
का मग तोरण
विलसो दारी
ग
आता कसली चोरी
ग |