ती रात्र कुसुंबी बहराची
स्पर्शाच्या गहि-या जहराची

ती डोळे जडवुन मला म्हणाली, "राया,
वय ऐन्यातील हे नका घालवू वाया"
त्या नजरबंदिच्या कहराची
ती रात्र कुसुंबी बहराची

घातली लाडकी हळुच खुणेची शीळ
चांदण्यात भिजला गालावरचा तीळ
अशि मदन झोकल्या प्रहराची
ती रात्र कुसुंबी बहराची

काळीज बुडवुनी जाय मधाची वाट
हातात जडवुनी हात शोधिली वाट
स्वप्नांच्या धूसर शहराची
ती रात्र कुसुंबी बहराची
 
 
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - अरुण दाते
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.