उघडी नयन शंकरा
वसंत ये वनांतरी
द-या-द-यात
नाचती गात यक्षकिन्नरी
अचल ध्यान हे
तुझे, मला न
आज पाहवे
जिवा-शिवांत
दूरता, मला
न आज साहवे
ऊठ चंद्रशेखरा,
करास या धरी
करी
पहा प्रसन्न
पद्मिनी जलाशयात
डुंबिती
नील कमलिनीस
त्या राजहंस
चुंबिती
अधीर आस माझिया,
थरथरे मनी उरी |