वाकल्या दिशा
फुलून स्निग्ध
रंग सावळा,
या फुलांत,
या सुरांत,
चंद्र घालतो
गळा
पावले अशी सलील
नादती कुठून
नाद ?
मी क्षितिज
वाहतो तरी जुळे
न शब्द, गीत.
दु:ख एक पांगळे
जशी तरूंत सावली
या उरात पेटलीस,
का उन्हास काहिली
?
असे कसे सुने
सुने मला उदास
वाटते
जशी उडून पाखरे
नभात चालली
कुठे ? |