जनी उकलिते वेणी
तुळशीचे बनी
हाती घेऊनिया लोणी
डोई चोळी चक्रपाणी
माझे जनीला नाही कोणी
म्हणुनी देव घाली पाणी
जनी सांगे सर्व लोका
न्हाऊ घाली माझा पिता
रचना
-
संत जनाबाई
संगीत
-
यशवंत देव
स्वर
-
आशा भोसले