नीज माझ्या
नंदलाला, नंदलाला
रे
शांत हे आभाळ
सारे
शांत तारे,
शांत वारे
या झऱ्याचा
सूर आता मंद
झाला, मंद झाला
रे
झोपल्या गोठ्यात
गाई
साद वा पडसाद
नाही
पाखरांचा गल्बलाही
बंद झाला, बंद
झाला रे
सावल्यांची
तीट गाली
चांदण्याला
नीज आली
रातराणीच्या
फुलांचा गंध
आला, गंध आला
रे
नीज रे आनंदकंदा,
नीज रे माझ्या
मुकुंदा
आवरी या घागऱ्यांच्या
छंदताला, छंदताला
रे
|