सोनसकाळी सर्जा
सजला हसलं हिरवं
रान
राघुमैना रानपाखरं
गाउ लागली गान
!
झुळुझुळु आला
पहाटवारा
हळुच जागवी
उभ्या शिवारा
झाडं वेली नीज
सांडती नाचनाचतं
पान
राघुमैना रानपाखरं
गाउ लागली गान
!
पिढ्यापिढ्यांचं
पातक सरलं
शिवनेरीला शिव
अवतरलं
शिवरायांच्या
मंगल चरणी
पावन झाली अवघी
धरणी
जयभवानी बोल
गर्जती आज पाचही
प्राण
राघुमैना रानपाखरं
गाउ लागली गान
!
|