काय तुझे उपकार
पांडुरंगा
॥
सांगो मी या
जगामाजी आतां
॥१॥
जतन हें माझें
करूनि संचित
।
दिलें अवचित
आणूनियां ॥२॥
घडल्या दोषांचे
न घाली भरी
।
आली यास थोरी
कृपा देवा
॥३॥
नव्हते ठाउकें
आइकलें नाहीं
॥
न मागतां पाहीं
दान दिलें
॥४॥
तुका म्हणे
याच्या उपकारासाटीं
।
नाहीं माझे
गाठीं कांही
एंक ॥५॥ |