चंदाराणी, चंदाराणी, का ग दिसतेस थकल्यावाणी

शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी ?

वारा, वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टकिशी

काठी देखिल नसते हाती, थोडी नाही विश्रांति
चढसि कैसी, कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखंड फिरशी

वाडा, घरकुल, घरटे नाही, आई नाही, अंगाई
म्हणुनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - आशा भोसले
चित्रपट - जिव्हाळा (१९६८)
For the printable version of this song, click here.