पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
आले मनात नवखे उमळून भाव सारे

माझ्याच लोचनांना झाले अनोळखी मी
कळले न पाऊले की सोडूनी जाती भूमी
येती कसे फुलोनी, अंगावरी शहारे

मज पाहू पाहू वाटे अवघी निसर्ग शोभा
माझा नि सृष्टीचा या आहे जुना घरोबा
धनदौलती सुखाच्या, उघडूनी देती दारे

नसता मनात माझ्या मज आज सौख्य भेटे
ओठात हे सुखाचे सुमधूर गीत येते
मनी मोर धुंद होती, उभवूनिया पिसारे
 
 
गीत - गंगाधर महांबरे
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - आशा भोसले
चित्रपट - सोबती (१९७९)
For the printable version of this song, click here.