जो जो गाई,
अंगाई गाते,
बाळ माझ्या
नीज ना !
ज्योत मंदावली
पेंगते साउली
पानोपानी वारा
हलेना
बाळा माझ्या
नीज ना !
पाऊलचाळा
घुंगूरवाळा
का नीज नाही
राजा तुला ?
इवल्या पापण्या
शिणल्या ना
?
बाळा माझ्या
नीज ना !
डोळे फुलांचे
मिटलेत बाई
ओठांत दाटून
ये जांभई
बाळास माझ्या
आता निजू द्या
काऊचिऊ या सारे
उद्या !
बाळा माझ्या
नीज ना !
|