शारद सुंदर
चंदेरी राती
स्वप्नांचा
झुलतो झुला
थंड या हवेत
घेऊन कवेत साजणा
झुलव मला !
साजणा रे, मोहना
रे, ऐक ना रे
तुझ्याचसाठी
रे तुझ्याचसाठी,
सगेसोयरे मी
सांडीले पाठी
मोहन मधुर राती
भराला येऊ दे
प्रीती
प्रीतीची हीच
न रीती ?
कशाला कुणाची
भिती ?
झाडामागे चांद
हा वरती आला,
ये ना, ये ना
? आतुर जीव
हा झाला;
मी भूलावे,
स्वैर व्हावे,
गीत गावे !
वाऱ्यात लहर
मंद
फुलांचा मादक
गंध
मोगरा चमेली
कुंद
जीवाला करिती
धुंद
माझ्या देही
पुनवचांदणे
साजे,
प्राणांमध्ये
प्रीतीची पावरी
वाजे;
आज राया, धुंद
काया मोहवाया
|