स्वप्नात साजणा
येशील का ?
चित्रात रंग
हे भरशील का
?
मी जीवन गाणे
गावे, तू स्वरात
चिंब भिजावे
दोघांनी हरवून
जावे, ही किमया
नकळत करशील
का ?
ही धूंद प्रीतीची
बाग, प्रणयाला
आली जाग
रोमांचित गोरे
अंग, विळख्यात
रेशमी धरशील
का ?
प्रतिमेचे चुंबन
घेता, जणू स्वर्गच
येई हाता
मधुमिलन होता
होता, देहात
भरून तू उरशील
का ?
|