पान जागे फूल
जागे, भाव नयनी
जागला,
चंद्र आहे साक्षिला,
चंद्र आहे साक्षिला
चांदण्याचा
गंध आला, पौर्णिमेच्या
रात्रिला,
चंद्र आहे साक्षिला,
चंद्र आहे साक्षिला
!
स्पर्श हा रेशमी,
हा शहारा बोलतो
सूर हा, ताल
हा, जीव वेडा
डोलतो
रातराणीच्या
फुलांनी, देह
माझा चुंबिला
!
लाजरा, बावरा,
हा मुखाचा चंद्रमा
अंग का चोरिसी,
दो जीवांच्या
संगमा
आज प्रीतीने
सुखाचा, मार्ग
माझा शिंपिला
!
|