मान वेळावुनी
धुंद बोलू नको
चालताना अशी
वीज तोलू नको
ऐक माझे जरा,
हट्ट नाही खरा
दृष्ट लागेल
ग दृष्ट लागेल
ग
आज वारा बने
रेशमाचा झुला
ही खुशीची हवा
साद घाली तुला
मोर सारे तुझे,
हे पिसारे तुझे
रूप पाहून हे
चंद्र भागेल
ग
पाहणे हे तुझे
चांदण्याची
सुरी
हाय मी झेलली
आज माझ्या उरी
लाट मोठी फुटे,
शीड माझे कुठे
?
ही दिशा कोणती
? कोण सांगेल
ग ?
|