स्वरगंगेच्या
काठावरती वचन
दिले तू मला
गतजन्मीची खूण
सापडे, ओळखले
का मला
वदलीस तू, मी
सावित्री ती
शकुंतला मी,
मी दमयंती
नाव भिन्न परी
मी ती प्रिती
चैतन्याचा पूर
तेधवा गंगेला
पातला
अफाट जगती जीव
रजःकण
दुवे निखळता
कोठुन मीलन
जीव भुकेला
हा तुजवाचुन
जन्मांमधूनी
पिसाट फिरता,
भेट घडे आजला
|