दिसते मजला
सुखचित्र नवे
मी संसार माझा
रेखिते !
प्रीत तुझी
माझी फुलावी
या फुलत्या
वेलीपरी
भाव मुके ओठांत
यावे गंध जसा
सुमनांतरी
शब्दाविना मनभावना
अवघ्याच मी
तुज सांगते
!
हात तुझा हाती
असावा, साथ
तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून
यावे, आस ही
माझ्या उरी
तुजसंगती क्षण
रंगती निमिषात
मी युग पाहते
!
स्वर्ग मिळे
धरणीस येथे
रंग नवे गगनांगणी
सप्तसुर लेवून
यावी रगिणी
अनुरागिणी
तुझियासवे सुखवैभवे
सौभाग्य हे
नित मागते !
|