राजाच्या रंगम्हाली,
सोन्याचा बाई
पलंग
रूप्याचा खांब
त्येला, मोत्याची
झालर
राजाच्या रंगम्हाली,
पराची मऊ गादी
जरीचा चांदवा,
रेशमी शिणगार
गडनी, सजनी,
गडनी सजनी ग
राजाच्या रंगम्हाली,
रानी ती रुसली
बोलं ना, हसं
ना, उदास नजर
राजाच्या रंगम्हाली,
राजानं पुशिलं
डोळ्याची कमळं
उघडा, व्हटांची
डाळिंबं
गडनी, सजनी,
गडनी सजनी ग
राजाच्या रंगम्हाली,
रानी वो सांगिते
सुना सोन्याईन
म्हाल, कशाला
बडीवार
मायेच्या पूतापायी,
रानी ग रडीते
आसवांची गंगा
व्हाते, भिजीला
पदोर
गडनी, सजनी,
गडनी सजनी ग
|