हसतेस अशि का मनी ?
कोण ग उभे तुझ्या अंगणी ?

कितिकदा वळुनि पाहशी
अन्‌ पुन्हा नजर वळविशी
हा लपंडाव खेळशी
कोण ग उभे तुझ्या अंगणी ?

अडविसी मुखावर हसे
थरकप ह्रुदयी होतसे
लागले कुणाचे पिसे
कोण ग उभे तुझ्या अंगणी ?

वळते न जीभ का मुकी ?
रक्तिमा पसरतो मुखी ?
रेखिले चित्र हे कुणी !
कोण ग उभे तुझ्या अंगणी ?

कोण ग ? तेच का गडे ?
पण कशास हो एवढे ?
अगबाइ मुळि न आवडे
नव्हे का नावहि संभाषणी ?
कोण ग उभे तुझ्या अंगणी ?
 
 
गीत - राजा बढे
संगीत - नागेश मसुतो
स्वर - लता मंगेशकर
For the printable version of this song, click here.