शालू हिरवा
पाच नि मरवा
वेणि तिपेडी
घाला
साजणी बाई येणार
साजण माझा !
गोऱ्या भाळी
चढवा जाळी नवरत्नांची
माला
साजणी बाई येणार
साजण माझा !
चूलबोळकी इवली
इवली भातुकलीचा
खेळ ग
लुटूपुटीच्या
संसाराची संपत
आली वेळ ग
रेशिमधागे ओढिति
मागे व्याकुळ
जिव हा झाला
सूर गुंफिते
सनई येथे झडे
चौघडा दारी
वाजत गाजत घोड्यावरुनी
येइल आता स्वारी
मी वरमाला घालिन
त्याला मुहूर्त
जवळी आला
मंगल वेळी मंगल
काळी डोळा का
ग पाणी ?
साजण माझा हा
पतिराजा मी
तर त्याची राणी
अंगावरल्या
शेलारीला बांधिन
त्याचा शेला
|